Breaking News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी : कोरोना काळातील 18 महिन्यांचा थकीत महागाई भत्ता मिळणार!!
सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी सध्या एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोना महामारीच्या काळात रोखून ठेवण्यात आलेल्या 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याबाबत (DA Arrears) पुन्हा एकदा आशा निर्माण झाली असून, तो मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोरोना काळात केंद्र सरकारच्या निर्णयानुसार सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढ 18 महिन्यांच्या कालावधीसाठी स्थगित ठेवण्यात आली होती. या काळात कर्मचारी पूर्ण क्षमतेने सेवा बजावत होते, मात्र आर्थिक अडचणींचे कारण पुढे करत डी.ए वाढ रोखण्यात आली होती. या निर्णयाचा फटका केंद्र व राज्य सरकारच्या लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना बसला.
सदर 18 महिन्यांच्या कालावधीत कोणतीही डी.ए वाढ लागू करण्यात आलेली नव्हती. त्यानंतर पुढील कालावधीत डी.ए वाढ लागू करण्यात आली असली तरी, रोखून ठेवलेल्या 18 महिन्यांच्या डी.ए वाढीचा फरक मात्र अदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्या काळातील कोणताही आर्थिक लाभ मिळू शकला नाही.
या निर्णयामुळे अनेक कर्मचारी संघटना तसेच पेन्शनधारक संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका अद्यापही प्रलंबित आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सरकारकडून सदर 18 महिन्यांच्या डी.ए थकबाकीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी अपेक्षा कर्मचारी वर्गामध्ये निर्माण झाली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, डी.ए वाढ रोखण्यात आलेला कालावधी हा 01 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 असा एकूण 18 महिन्यांचा आहे. याच कालावधीत डी.ए वाढ स्थगित करण्यात आली होती. आता या रोखून ठेवलेल्या डी.ए वाढीच्या बदल्यात ‘वन टाईम सेटलमेंट’ करण्याची मागणी कर्मचारी युनियनकडून सरकारकडे करण्यात येत आहे.
वन टाईम सेटलमेंट म्हणजे संपूर्ण 18 महिन्यांची डी.ए थकबाकी रोख स्वरूपात न देता, त्याऐवजी एकाच वेळी महागाई भत्त्यामध्ये ठराविक टक्केवारीने वाढ करणे. मिळालेल्या माहितीनुसार, ही वाढ सुमारे 5 टक्क्यांपर्यंत असू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या तसेच पेन्शनधारकांच्या मासिक उत्पन्नात कायमस्वरूपी वाढ होऊ शकते.
एकूणच, 18 महिन्यांच्या थकीत महागाई भत्त्याबाबत सरकारकडून अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, येत्या काळात या विषयावर मोठा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही बाब आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.