राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 04 अत्यंत महत्त्वाचे शासन निर्णय (GR) निर्गमित दि. 09/01/2026
आज दिनांक 09 जानेवारी 2026 रोजी राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 04 अत्यंत महत्त्वाचे शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आले आहेत. हे शासन निर्णय विविध विभागांशी संबंधित असून त्याचा थेट परिणाम संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच संस्थांवर होणार आहे. खाली या चारही शासन निर्णयांची सविस्तर माहिती दिली आहे.
दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयानुसार मुकबधीर, मतिमंद तसेच अस्थिव्यंग या प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहायक अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या अनुदानामध्ये संबंधित संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी आवश्यक निधीचाही समावेश आहे. यामुळे दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या संस्थांना मोठा आर्थिक आधार मिळणार असून त्यांच्या कामकाजाला चालना मिळणार आहे.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या संदर्भातही महत्त्वाचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामधील यांत्रिकी संवर्गातील अभियंत्यांना जलसंपदा विभागाचे सेवाप्रवेश नियम लागू करण्याबाबत शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे संबंधित अभियंत्यांच्या सेवा अटी, पदोन्नती तसेच इतर सेवा विषयक बाबींमध्ये स्पष्टता येणार असून कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) अंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणाकडून सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (DTO) यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांचे त्रैमासिक शुल्क अदा करण्यासाठी आवश्यक निधीचे वितरण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे NPS अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाशी संबंधित कामकाज अधिक सुरळीतपणे पार पडणार आहे.
महसूल व वन विभागाच्या अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची 36 पदे तसेच विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयकांची 06 पदे, अशा एकूण 42 कंत्राटी पदांना मुदतवाढ देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था अधिक सक्षम राहण्यास मदत होणार असून संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगाराची सुरक्षितता मिळणार आहे.
वरील सर्व 04 शासन निर्णयांचे (GR) अधिकृत आदेश डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर Click Here करून सविस्तर माहिती पाहता येईल.