Gold Rate : सोने-चांदीचे दरात विक्रमी वाढ, जाणून घ्या आजचे ताजे दर
आज भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम थेट बाजारावर दिसून आला असून दोन्ही धातूंनी नवे उच्चांक गाठले आहेत.
आज एका दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 2883 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचा दर 14475 रुपयांनी महागला आहे. जीएसटीशिवाय चांदीचा दर आज 257283 रुपये प्रति किलो इतका असून, जीएसटीसह तो 265001 रुपये प्रति किलो झाला आहे.
सोन्याचा जीएसटीशिवाय दर आज 140005 रुपये प्रति तोळा झाला आहे. जीएसटीसह सोन्याचा दर 144205 रुपये प्रति तोळा इतका आहे. याआधी शुक्रवारी चांदीचा दर 242808 रुपये प्रति किलो, तर सोन्याचा दर 137122 रुपये प्रति तोळा होता.
आजच्या वाढीमुळे सोन्याचा जुना उच्चांक मोडला गेला आहे. याआधी सोन्याचा जीएसटीशिवाय उच्चांक 138181 रुपये प्रति तोळा होता. चांदीनेही 7 जानेवारी रोजीचा 248000 रुपयांचा विक्रम मागे टाकला आहे.
कॅरेटप्रमाणे सोन्याचे आजचे दर
- 24 कॅरेट सोने : 140005 रुपये प्रति तोळा (GST शिवाय)
- 23 कॅरेट सोने : 2871 रुपयांनी वाढून 139444 रुपये प्रति तोळा
- GSTसह दर : 143627 रुपये
- 22 कॅरेट सोने : 2641 रुपयांची वाढ, दर 128245 रुपये प्रति तोळा
- GSTसह दर : 132092 रुपये
- 18 कॅरेट सोने : 105004 रुपये प्रति तोळा
- GSTसह दर : 108154 रुपये
- 14 कॅरेट सोने : 1687 रुपयांची वाढ, दर 81903 रुपये प्रति तोळा
सोनं-चांदी महाग का झाली?
सोन्या-चांदीच्या दरवाढीमागे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी दोन्ही कारणे आहेत. 2025 मध्ये आतापर्यंत सोन्याच्या दरात सुमारे 65 टक्के वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 4600 डॉलर प्रति औंस, तर चांदीचा दर 84.5 डॉलर प्रति औंस इतका आहे.
जगभरात सुरू असलेले भूराजकीय तणाव, युद्धसदृश परिस्थिती आणि अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. याशिवाय अमेरिकेतील व्याजदर कपातीची शक्यता आणि डॉलरमधील कमजोरी हे देखील दरवाढीचे महत्त्वाचे कारण आहे.
चांदीच्या दरवाढीमागे औद्योगिक वापर वाढणे हे मुख्य कारण आहे. सौरऊर्जा प्रकल्प आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने तिची मागणी वाढली आहे.
दर कुठून ठरतात?
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) कडून दररोज सोने आणि चांदीचे दर जाहीर केले जातात. हे दर देशभरात जवळपास समान असतात. IBJA दर दिवसातून दोन वेळा दर जाहीर करते. हे दर GST आणि मेकिंग चार्जेसशिवाय असतात.
टीप: शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि गुंतवणूक हे जोखमीच्या अधीन असतात. वरील माहिती ही केवळ सामान्य माहितीसाठी असून गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.