राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दि. 14-01-2026 रोजी महत्वाचा शासन निर्णय GR निर्गमित
राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या तसेच स्वेच्छा सेवानिवृत्ती घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्रशासन विभागाने एक सन्मानपूर्वक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
या शासन निर्णयानुसार, दरवर्षी नियमित किंवा स्वेच्छा सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दीर्घ सेवेस आणि त्यांच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांना स्मृतिचिन्ह देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सदर स्मृतिचिन्ह हे कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सेवेला आदरांजली म्हणून देण्यात येणार असून, त्यांच्या शासकीय सेवेमधील योगदान कायम स्मरणात राहावे हा यामागील उद्देश आहे.
या उपक्रमासाठी आवश्यक असलेली स्मृतिचिन्हे खरेदी करण्यास शासनाने परवानगी दिली असून, त्यावरील खर्चास वित्त विभागाच्या मान्यतेनुसार मंजुरी देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळी अधिक सन्मान मिळणार असून, शासनाकडून त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली जात आहे, असे स्पष्ट होते.