5 जानेवारीपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर; आदेश जारी
राज्यात वाढत्या थंडीमुळे सरकारने शाळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नर्सरीपासून ते इयत्ता 12 वीपर्यंतच्या सर्व शाळांना 5 जानेवारीपर्यंत सुट्टी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यासंदर्भात उत्तर प्रदेश सरकारने अधिकृत आदेश जारी केला आहे. सध्या राज्यात कडाक्याची थंडी, दाट धुके आणि गार वारे यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या निर्णयानुसार CBSE, ICSE तसेच राज्य मंडळाच्या सर्व शाळा 5 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. थंडीची लाट आणि दाट धुक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना थंडीचा जास्त फटका बसलेल्या भागांना भेट देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात ब्लँकेट, शेकोटी यांची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
कोणीही उघड्यावर झोपू नये याची काळजी घेण्याचे तसेच शहरांमध्ये उभारलेले रात्र निवारे सुरू ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
यासंदर्भात उत्तर प्रदेश सरकारने अधिकृत आदेश जारी केला आहे. सध्या राज्यात कडाक्याची थंडी, दाट धुके आणि गार वारे यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जर थंडीची परिस्थिती अशीच कायम राहिली, तर शाळांची सुट्टी पुढे वाढवण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.